
कऱ्हाड : बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या तासवडे औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज छापा टाकला. तेथून सुमारे चार टन प्लॅस्टिक जप्त केले. तेथील एका कंपनीत पत्रावळी, द्रोण आणि प्लॅस्टिकचे ग्लास तयार करताना छापा टाकण्यात आला. संबंधितांकडून सुमारे ४० हजार पत्रावळी, सुमारे दहा हजार द्रोण आणि ७० बॉक्स प्लॅस्टिकचे ग्लास आणि प्लॅस्टिक स्ट्रॉ जप्त केल्या. संबंधितांना प्रत्येकी पाच हजार दंडही केल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, क्षेत्र अधिकारी अर्चना जगदाळे यांनी दिली.