
-संदीप पारवे
मसूर : परिसरातील शेतकऱ्यांसमोर आता शेतमाल, चारा चाेरीसह अन्य उपद्रवांमुळे नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला असताना या नव्या संकटामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहे. कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देणारा ठरत असल्याने त्यावरच चोरटे डल्ला मारत आहे.