
ही माेहिम आज (साेमवार) येथील जुन्या बस स्थानक चौकात, मल्हारपेठ- पंढरपूर, कोरेगाव - कऱ्हाड मार्गावर कडक मोहीम राबवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
मसूर (जि. सातारा) ः कोरोना पुन्हा एकदा उसळी घेण्याच्या मार्गावर असल्याने पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. 22 वाहनचालकांवर मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई केली. 11 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क ग्राहकांना दुकानात घेऊन गर्दी करत नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा धडाका रविवारपासून सुरू करण्यात आला.
पोलिस दूरक्षेत्रासमोर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी व पोलिस सहकाऱ्यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, नियमांचे पालन व्हावे, यासाठी कारवाई सुरू करण्यात आली. ही माेहिम आज (साेमवार) येथील जुन्या बस स्थानक चौकात, मल्हारपेठ- पंढरपूर, कोरेगाव - कऱ्हाड मार्गावर कडक मोहीम राबवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंची अचानक का भेट घेतली? ती देखील सुरुचीत, पडला ना प्रश्न : वाचा सविस्तर
योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये पहिला पेपरलेस बजेट सादर केला
सहकारी संस्थांनी विरोधकांच्या भूमिकेला बळी पडू नये : केशव उपाध्ये
Edited By : Siddharth Latkar