esakal | माथाडी कामगार चळवळीला उपमुख्यमंत्री-कामगारमंत्र्यांचं पाठबळ : आमदार शशिकांत शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडी कामगार चळवळीला उपमुख्यमंत्री-कामगारमंत्र्यांचं पाठबळ : आमदार शशिकांत शिंदे

माथाडी कामगारांची कामे कमी होत चालली आहेत. त्यामध्येच केंद्र सरकारने शेती व पणनचा आदेश काढला. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना शेतकरी ऐवजी काही खासगी व्यापारी, दलाल हे बेकायदेशीर प्रकारे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.

माथाडी कामगार चळवळीला उपमुख्यमंत्री-कामगारमंत्र्यांचं पाठबळ : आमदार शशिकांत शिंदे

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : माथाडी कामगार चळवळीला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर खासदार शरद पवार यांनी जसे प्रेम दिले, तसे प्रेम आणि माया आज उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देत आहेत, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. ते आज मुंबईतील बैठकीवर भाष्य करताना फेसबुक पोस्टव्दारे आपले म्हणणे मांडले. 
 
माथाडी कामगारांची कामे कमी होत चालली आहेत. त्यामध्येच केंद्र सरकारने शेती व पणनचा आदेश काढला. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना शेतकरी ऐवजी काही खासगी व्यापारी, दलाल हे बेकायदेशीर प्रकारे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचे पगार कमी झालेत. हाताला कामे मिळेनात या आदी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वरील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. 

Dont Worry! रक्ताचं मुबलक प्रमाण, वाचणार अनेकांचे प्राण!

भारतातील इतर राज्यामध्ये या कायद्याला विरोध केला गेला आहे. तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी टिकला पाहिजे, तसेच बाजार समिती आणि पणन टिकले पाहिजे यासाठी या निर्णयाला स्थगिती देता येते का याबाबतीतही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर माथाडी कामगारांच्या पतपेढीची कपात ही आदेश काढून रद्द करण्यात आली होती. ती कपात पूर्ववत करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. 

MarathaReservation : तर मी राजीनामा देईन : उदयनराजे

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन सचिव अनुप कुमार, मा. सोनी, लेबर कमिशनर उपस्थित होते. तसेच कामगार संघटनेच्यावतीने आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप, चंद्रकांत पाटील आदींचीही उपस्थिती होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे माथाडी कामगारांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

https://www.facebook.com/shashikantshindeofficialpage/posts/3339697842749981