माथाडींच्या वय निश्चितीबाबत कोणतीही कार्यवाही नको : मुश्रीफ

कामगार विभागाने काढलेले पत्र मागे घ्यावे
Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal

ढेबेवाडी (सातारा) : माथाडी कामगारांच्या (Mathadi workers) सेवानिवृत्तीचे वय निश्चित करण्याच्या आदेशावर सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतीही कार्यवाही करू नये. याबाबतीत कामगार विभागाने काढलेले पत्र मागे घ्यावे, अशी स्पष्ट सूचना कामगारमंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले होते, त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नुकतीच मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

Summary

माथाडी कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय निश्चित करण्याच्या आदेशावर सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतीही कार्यवाही करू नये.

माथाडी कामगारांच्या आर्थिक अडचणीकरिता मंडळात जमा असलेल्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेतून कर्ज देण्याबद्दलच्या मागणीचा आढावा घ्यावा, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या शिकलेल्या मुलांना प्राधान्य देण्याबाबत व माथाडी मंडळात कर्मचाऱ्यांची भरती होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, माथाडी मंडळावर नरेंद्र पाटील यांची मंडळ सदस्य म्हणून नेमणूक करण्याबद्दलचा प्रस्ताव आणि माथाडी मंडळावर अध्यक्ष व सचिवाच्या पूर्ण वेळ नियुक्त्या होण्याबद्दलची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या.

Hasan Mushrif
लबाड ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होईल; खासदार रणजितसिंहांचा घणाघात
Hasan Mushrif
Hasan Mushrif

बैठकीला संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, अध्यक्ष एकनाथराव जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, उपसचिव पुलकुंडवार, कामगार आयुक्त सुरेश जाधव, माथाडी विभागाच्या लोखंडे, कक्ष अधिकारी संजय काळभोर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com