कोरोना संकटात उपासमारीची वेळ; माथाडी कामगार गुरुवारपासून संपावर

Mathadi Workers
Mathadi Workersesakal

सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात जिल्ह्यातील अनेक कामगारांवर बेरोजगार होत उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगारांना कंपन्यांनी काम नसल्याने काढून टाकणे, कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कामगारांना अर्थसाहाय्य देणे, कामगारांना वेळेत पगार न देणे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ५०० माथाडी कामगार (Mathadi Workers) गुरुवारपासून (ता. १) संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी (State of Maharashtra Mathadi), ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे (General Workers Union) सेक्रेटरी राजकुमार गोळे (Rajkumar Gole) यांनी सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाला निवेदनाद्वारे दिला आहे. (Mathadi Workers On Strike From Thursday Satara Marathi News)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे करत अनेकांना सहकार्य केले. या काळात काही कामगारांचे कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाले आहेत. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे, पीएफची प्रकरणे रखडविणे, मार्केट यार्डमधील अनेक दुकानांनी कोरोनाच्या काळात कामगारांना काढून टाकत त्यांचे पगार थकविले आहेत.

Mathadi Workers
'सरकारचा निर्णय चुकीचा; आषाढी वारीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावा'

तसेच कार्यरत असणाऱ्या कामगारांची पगार वाढ थांबविलेली आहे. कामगारांच्या मासिक नोंदी रखडल्या असून, अन्य मागण्या असून, याबाबत सातारा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून अनेक कामगारांवर अन्याय सुरू आहे. त्यामुळे या सर्व मागण्यांचा तत्काळ विचार व्हावा अन्यथा जिल्ह्यातील दोन हजार ५०० हून अधिक माथाडी कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

Mathadi Workers On Strike From Thursday Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com