कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ, जगच दिसू लागलंय पिवळं : नगराध्यक्षांचा सडेतोड पलटवार

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ, जगच दिसू लागलंय पिवळं : नगराध्यक्षांचा सडेतोड पलटवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडमधील शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाचा विषय कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते अतुल भोसले यांच्यापर्यंत आणून ठेवला आहे. उलट आमचे नेत्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकारच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासह कोरोना काळात त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. मात्र, ते कार्य न दिसणाऱ्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ झाली आहे. त्यामुळेच त्यांना सारे जगच पिवळे दिसते आहे, अशी टीका नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली. 

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या टिकेला नगराध्यक्षा शिंदे यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "पालिकेच्या मासिक सभेचे ठराव सात दिवसांत स्वाक्षरीसाठी येणे अपेक्षित होते. मात्र, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी ते दोन दिवस उशिरा दिले. त्यावर आक्षेपांची पत्रे होती. ती पाहून स्वाक्षऱ्या केल्या. मात्र, तरीही ठरावाला वेळ होत असल्याचे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी नगरसवेकांना दिले. त्यामागे कोणाचा राजकीय दबाव होता का, ते पत्र कोणाच्या तरी सांगण्यावरून काढण्यात आले होते, याची शंका येऊ लागली आहे. 

पालिकेच्या मासिक सभेनंतर सात दिवसांत सभेतील ठराव व इतिवृत्त नवीन कायद्यानुसार नगराध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या येणे अपेक्षित आहे. मात्र, ते उशिरा आले. त्यामुळे कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेले आरोप खोटे आहेत. मुख्याधिकारी डाके यांनी पत्र नगरसेवकांना काढले, ते काढण्यामागे त्यांच्यावर काही राजकीय दबाव असल्याची शंका येऊ लागली आहे. कॉंग्रेसने कऱ्हाडचा स्वाभिमान, अभिमान अशी मोठी वाक्‍ये वापरली. मात्र, कऱ्हाडकर नागरिकांनी मला निवडून देत नगराध्यक्षपदी बसवले आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे गावाला कमीपणा येईल, असे काम कधीच झालेले नाही, होणारही नाही.''

कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नगराध्यक्षांचे कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार
 
शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाचा विषय त्यांनी नेते अतुल भोसले यांच्यापर्यंत आणून ठेवला. पण, त्यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकारच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासह कोरोना महामारीच्या काळात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. पालिकेने सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात पहिला नंबर मिळवला आहे. याही वर्षी हॅट्रिक साधण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com