
-शांत घाडगे
सातारा : कुटुंबात जेमतेम चौदा गुंठे जमीन, दहा बाय दहाच्या एका खोलीत संसार, पोटाची खळगी भरण्यासाठी वडिलांसोबत बॅण्ड पथकात वादन, तर भर उन्हात विहिरीमधील गाळ काढत अंगावर घामाच्या धारा झेलत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असताना देशसेवेची ऊर्मी त्यास स्वस्थ बसून देत नव्हती. भरतीसाठी तब्बल दहा ते बारा वेळा प्रयत्न करूनही यश वारंवार हुलकावणी देत होते.