esakal | नगराध्यक्षपदासाठी चूरस वाढली; शिवेंद्रसिंहराजेंवर लक्ष

बोलून बातमी शोधा

Medha Muncipal Council Election

नगराध्यक्षपदासाठी चूरस वाढली; शिवेंद्रसिंहराजेंवर लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा (जि. सातारा) : मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, पदासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेले तिन्ही अर्ज छाननीत पात्र ठरल्याची माहिती मुख्याधिकारी अमोल पवार यांनी दिली. नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी त्यांची मुदत संपल्याने राजीनामा दिला होता. नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग बळवंत जवळ यांनी दोन व पांडुरंग दामोदर देशपांडे यांनी एक असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे तिन्ही अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.

नगरपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारांनी 3 अर्ज भरल्यामुळे आता पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा: शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दास मान; नगराध्यक्षांचा राजीनामा

सोमवारी पांडुरंग जवळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पांडुरंग देशपांडे यांनी अर्ज भरल्यामुळे मेढ्यात चर्चेला उधाण आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पांडुरंग जवळ यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी अर्ज भरला. मात्र, त्यानंतर पांडुरंग देशपांडे यांनीही अर्ज भरला आहे.

उद्या (ता. 22 एप्रिल) सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज माघारी घ्यायची मुदत असून, गरज पडल्यास 23 तारखेला मतदान होईल. उपनगराध्यक्षपदासाठी 23 ला सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज भरायचे आहेत. त्याची छाननी लगेच होणार असून, त्यानंतर अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ असेल व गरज पडल्यास मतदान प्रक्रिया पार पडेल.

कोल्हटकर आळी, चिमणपु-यातील महिलांचे मंगळसूत्र हिसकावले