ऑक्‍सिजनवरील रुग्णांचा जीव टांगणीला; आणीबाणीत डॉक्‍टर ठरले 'Lifeline' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Gujar

ऑक्‍सिजनवरील रुग्णांचा जीव टांगणीला; आणीबाणीत डॉक्‍टर ठरले 'Lifeline'

विसापूर (सातारा) : या परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळीने पुसेगाव कोविड सेंटरमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच वेळी काही तांत्रिक बिघाडामुळे जनरेटर सुरू न झाल्याने ऑक्‍सिजनवरील (Oxygen) रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. ही अडचण लक्षात येताच येथील वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर (Medical Officer Aditya Gujar) यांनी समयसूचकता दाखवत स्वतः जनरेटर दुरुस्त करून सर्व ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटर मशिन (Oxygen concentrator Machine) पूर्ववत केल्या. या आणीबाणीच्या प्रसंगात डॉ. गुजर हे "लाइफलाइन' ठरले. (Medical Officer Aditya Gujar At Visapur Undoed The Oxygen concentrator Machine)

या सेंटरमध्ये 80 कोरोनाबाधित रुग्ण उपचाराधीन असून, त्यापैकी 20 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. गुरुवारी दुपारी वीजपुरवठ्यासोबतच जनरेटर सुरू होत नसल्याने ऑक्‍सिजनअभावी या रुग्णांचा जीव धोक्‍यात आला होता. त्यामुळे, रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती. याप्रसंगी डॉ. आदित्य गुजर यांनी समयसूचकता दाखवत टेक्‍निशियनला बोलाविण्यात कोणताही वेळ न दवडता स्वतः जनरेटर दुरुस्त करण्यास सुरुवात केली. अधिक तत्पर आणि उत्तम सेवा रुग्णांना मिळाव्यात, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या हातांना जनरेटर सुरू करण्यात यश आले. काही मिनिटांतच कोविड सेंटरचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होऊन ऑक्‍सिजन पुरवठा करणारी सर्व उपकरणेही कार्यान्वित झाली. काही विपरित घटना घडण्याच्या आत ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसोबत रुग्णालय प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला.

लसीकरणासाठी पुणे-कोल्हापुरातील लोक सातारा केंद्रांवर; ई-पासशिवाय बाहेरच्यांना जिल्ह्यात प्रवेश?

प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी जेवणाचे डबे घेऊन गेलो असता डॉ. गुजर आणि कर्मचाऱ्यांची जनरेटर दुरुस्त करण्यासाठी धावपळ सुरू होती. एरव्ही स्टेटेस्कोप, इंजेक्‍शन, ऑक्‍सिमीटर अशी सामग्री वापरणाऱ्या हातांनी स्क्रू- ड्राइवरच्या साहाय्याने जनरेटर सुरू केला. या घटनेतून त्यांची रुग्णांप्रती असलेली त्यांची आत्मीयता दिसून आली.

-ज्ञानेश्वर कुंभार, ग्रामस्थ, पुसेगाव

Medical Officer Aditya Gujar At Visapur Undoed The Oxygen concentrator Machine

Web Title: Medical Officer Aditya Gujar At Visapur Undoed The Oxygen Concentrator

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top