esakal | उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री घेणार कोरोनाचा आढावा; साताऱ्यात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar And Rajesh Tope

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे.

उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री घेणार कोरोनाचा आढावा; साताऱ्यात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus) साखळी तुटत नसल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) येत्या शुक्रवारी (ता. 28) साताऱ्यात येत आहेत. ते जिल्ह्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कोणता बुस्टर डोस (Booster Dose) देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Meeting Of Deputy Chief Minister Ajit Pawar And Health Minister Rajesh Tope Regarding Coronavirus In Satara On Friday)

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. प्रशासकीय पातळीवरून सुरू केलेले कडक लॉकडाउननंतरही (Lockdown) आकडे कमी होत नाहीत. सध्या जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दीड लाखावर आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन ती हतबल झाली आहे. कोरोना बाधितांवर गृह विलगीकरण कक्षात होणारे उपचार थांबवून आता संस्थात्मक विलगीकरणावर आरोग्य प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा गावपातळीवर होणार प्रसार रोखता येणार आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होऊ लागल्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार व आरोग्यमंत्री डॉ. टोपे येत्या शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी साताऱ्यात येत आहेत. ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व माहिती घेणार आहेत. त्यानंतर ते प्रशासन व आरोग्य विभागाला काही महत्त्वाच्या सूचनाही करणार आहेत.

हेही वाचा: हजाराच्या घोषणेची अंमलबजावणी कधी?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

मेडिकल कॉलेजचा आढावा

सातारा मेडिकल कॉलेजच्या कामाचाही आढावा ते घेणार आहेत. सध्या मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या सुविधांचे तपासणी होणार आहे. त्याच्या तयारीचाही ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचीही कानउघडणी करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

Meeting Of Deputy Chief Minister Ajit Pawar And Health Minister Rajesh Tope Regarding Coronavirus In Satara On Friday