esakal | 15 मे'पर्यंत लावलेला लॉकडाउन पूर्णपणे पाळा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil
15 मे'पर्यंत लावलेला लॉकडाउन पूर्णपणे पाळा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने 15 मेपर्यंत राज्यात लॉकडाउन जाहीर केला असून, या अनुषंगाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.

धक्कादायक! Ambulance चालकांकडून नातेवाइकांची आर्थिक लूट; जादा दराने भरमसाट भाडेआकारणी

15 मेपर्यंत लावलेला लॉकडाउन पूर्णपणे पाळला पाहिजे, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच बाजारपेठेत गर्दी करू नये, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, ""संपूर्ण कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे, तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. ज्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण झाले नाही अशा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच ज्या नागरिकांचे पहिले लसीकरण झाले आहे, अशा नागरिकांनी दुसरा डोस ठरवून दिलेल्या कालावधीतच घ्यावा, तसेच लसीकरणाचा मेसेज आल्यानंतरच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Edited By : Balkrishna Madhale