

कऱ्हाड : साखर काखान्यांचा गाळप हंगाम सुरु होवुन महिनाभराचा कालावधी होत आला. तरीही साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही असा आऱोप करत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांना बैठक घेण्याचे आवाहन केले होत.
त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी बैठक घेतली असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील नियोजन भवनमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ऊसदराचा तोडगा निघेल या आशेने शेतकऱ्यांचे डोळे या बैठकीतील निर्णयाकडे लागले आहेत.
ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनांच्यावतीने आंदोलन सुरु आहेत. त्यामुळे ऊस वाहतुकीची वाहने आडवुन ऊसाला शेतकरी संघटनाकडुन दर मागण्यात येत आहेत. त्याचा विचार करुन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत बैठकीचे साताऱ्यातील नियोजन भवनमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
त्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके, रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव,
शरज जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांना या बैठकीत अतिरीक्त जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी निमंत्रीत केले आहे. त्या बैठकीत यंदाच्या हंगामातील ऊसदराचा तोडगा निघेल अशी आशा आहे. त्यामुळे या बैठकीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी अकरा वाजता नियोजन भवनमध्ये बैठक होत आहे. त्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्या बैठकीस कारखानदारांनी प्रतिनिधी पाठवु नये स्वतः यावे असेही आवाहन अतिरीक्त जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेने पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे ऊसदरासंदर्भात बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी साखर कारखाना व शेतकरी संघटनांची ऊस दरासाठी दुसऱ्यांदा बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये तोडगा निघुन सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटेल अशी अशा आहे.
- पंजाबराव पाटील केंद्रीय अध्यक्ष, बळीराजा संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.