esakal | आज माझा वाढदिवस! तुमच्याकडून मला 'हे' गिफ्ट हवयं : उदयनराजे
sakal

बोलून बातमी शोधा

आज माझा वाढदिवस! तुमच्याकडून मला 'हे' गिफ्ट हवयं : उदयनराजे

आम्ही दरवर्षी राजरा होत असलेला 24 फेब्रुवारीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम व्यक्तींनी आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये असे आवाहन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

आज माझा वाढदिवस! तुमच्याकडून मला 'हे' गिफ्ट हवयं : उदयनराजे

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज (बुधवार ता. 24) होत असून, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आणि सातारा पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय खासदार उदयनराजेंनी स्वत:च घेतला असून, नागरिकांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठीच्या उपाययोजनांचे पालन करावे. कोरोनाचा प्रसार रोखणे आपले कर्तव्य असून, सर्वांनी आपल्याबरोबरच कुटुंबाची, समाजाची काळजी घेण्याचे आवाहन वाढदिवसानिमित्त उदयनराजेंनी केले आहे.

उदयनराजे यांनी कायमच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारण, समाजकारणाचा सर्वसामान्य माणूस केद्रबिंदू मानला आहे. गरीबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, ही भूमिका जपणाऱ्या उदयनराजेंनी स्वार्थ न पाहता सर्वसामान्यांचे हितच जोपासण्याचे काम केले. एखाद्या धनिकापेक्षा गोरगरीबाला मदत करणे, ही त्यांची विचारधारा आहे. हीच त्यांची विचारधारा महाराष्ट्रासोबत देशभर पोचण्याची आवश्‍यकता आहे. आज (ता. 24) खासदार उदयनराजे हे बाहेरगावी जाणार असल्याने नागरिकांनी, तसेच कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे गर्दी करू नये, असे आवाहन काटकर, शेंडे यांनी केले आहे. 

महाराष्ट्रातील मावळ्याने आफ्रिकेतील शिखरावर फडकावला तिरंगा

लग्न समारंभासाठी व-हाडींची वाढली मर्यादा 

उदयनराजेंचा प्रवास

जवान गौरव ससाणेंनी दोन अतिरेक्‍यांना धाडले यमसदनी

थोडं फार होणारच! उदयनराजे