
सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मंजूर असलेल्या नव्या सार्वजनिक कामांना ब्रेक लागला आहे. जुनी कामे अपूर्ण असताना नवी कामे हाती घेतल्यामुळे पुढील वर्षाचे लेबर बजेट मंजूर करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने जुनीच कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा मनरेगा आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नवी कामे सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.