
म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्यात व म्हसवड शहरात गेल्या आठ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे रुग्णास स्थानिक पातळीवरील नियोजित कोविड रुग्णालयासाठी पाच अत्याधुनिक व्हेंटिलेटर मशिन बेड त्वरित उपलब्ध करून देत असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.
म्हसवड येथे कदम यांनी नुकतीच धावती भेट दिली. त्या वेळी येथील कोरोना योद्ध्यांसमवेत कैलास भोरे यांनी श्री. कदम यांची भेट घेऊन गेल्या आठ दिवसांत म्हसवड शहरासह माण तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढत चाललेली संख्या व उपचारासाठी होत असलेली गैरसोयीचा पाढा त्यांच्या समोर मांडला. म्हसवड येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याबाबतची विनंती त्यांनी केली.
राज्यमंत्री कदम यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून म्हसवड येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याबाबतची चर्चा करून रुग्णालयासाठी पाच अत्याधुनिक व्हेंटिलेटर मशिन बेड दोन दिवसांत पाठवित असल्याचे सांगितले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे उपस्थित होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.