प्रवास होणार सुखकर! म्हसवड-नाशिक बससेवेस प्रारंभ

सल्लाउद्दीन चोपदार
Saturday, 17 October 2020

म्हसवड-नाशिक ही बस म्हसवडहून सकाळी दहा वाजता सुटते व म्हसवड, दहिवडी, फलटण, जेजुरी, सासवड, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, मंचर, नाशिक अशी जाते. नाशिक-म्हसवड ही बस नाशिकहून सकाळी सहा वाजता सुटून याच मार्गे म्हसवडला सायंकाळी सहा वाजता पोचते.

म्हसवड (जि. सातारा) : म्हसवड-नाशिक बसचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन म्हसवड पालिकेचे गटनेते धनाजी माने यांनी केले. प्रवाशांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून दहिवडी आगाराने म्हसवड-नाशिक ही बस सुरू केली आहे. या बसचा प्रारंभ म्हसवड पालिकेचे गटनेते धनाजी माने यांच्या हस्ते बसचे चालक व वाहकांचा सत्कार करून करण्यात आला.
 
ही बस म्हसवडहून सकाळी दहा वाजता सुटते व म्हसवड, दहिवडी, फलटण, जेजुरी, सासवड, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, मंचर, नाशिक अशी जाते. नाशिक-म्हसवड ही बस नाशिकहून सकाळी सहा वाजता सुटून याच मार्गे म्हसवडला सायंकाळी सहा वाजता पोचते. बसच्या प्रारंभप्रसंगी प्रा. डॉ. चंद्रकांत साबळे, बाळकृष्ण गोंजारी, वाहतूक नियंत्रक कोळी, विकास गोंजारी, अनिल लोखंडे, आकाश माने, माणिक झगडे उपस्थित होते. 

स्वच्छतेच्या जागृतीसाठी कऱ्हाडात तृतीय पंथियांची रॅली

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhaswad-Nashik Bus Service Started Satara News