सातारा जिल्ह्यासह राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहे.
कऱ्हाड : येत्या १५ दिवसांत दूध उत्पादकांच्या (Milk Producer) मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय किसान दिनापासून (ता. २३) जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलनासह जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील सर्व प्रकारची दूध वाहतूक बंद (Milk Transport Stopped) करण्याचा इशारा दूध उत्पादकांच्या बैठकीत देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.