मंत्री शेलार म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीवेळी ‘मविआ’ची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे, ते फुटणार आहेत, असे भाकीत मी केले होते."
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात मी पहिल्यांदाच येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या वाघनख्यांचे दर्शन घेतले. यातून मला प्रेरणा मिळाली आहे, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी व्यक्त केला.