esakal | नगरविकासमंत्र्यांनी चालवला ट्रॅक्टर, तर पालकमंत्र्यांची थेट शिवारात रपेट
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde-Balasaheb Patil

पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे महाराष्ट्रात शेतीची कामे सुरू आहेत. सर्वत्र भात, नाचणी, वरी या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरू आहेत.

नगरविकासमंत्र्यांनी चालवला ट्रॅक्टर, तर पालकमंत्र्यांची थेट शिवारात रपेट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भिलार (सातारा) : राज्याच्या मंत्रिमंडळातील नगरविकासमंत्री आणि ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांना शेतीची चांगलीच आवड असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारणातून (Politics) वेळ काढत ते शेती (Farm) करण्याची आवड जपताना दिसतात. वेळ मिळेल तसे वारंवार आपल्या जन्मगावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर Mahabaleshwar) या ठिकाणी येऊन शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत. (Minister Eknath Shinde Drove A Tractor In The Farm Satara Agriculture News)

पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे महाराष्ट्रात शेतीची कामे सुरू आहेत. सर्वत्र भात, नाचणी, वरी या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. याच कालावधीत स्वतः एकनाथ शिंदे यांनी शेतीकडे लक्ष दिले आहे. आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या (Tractor) साहाय्याने त्यांनी नांगरट केली. तसेच पारंपरिक पद्धतीने तरव्याच्या ठिकाणी पेरणी करून कुदळीने संपूर्ण तरवा कुदळून भाताची पेरणी पूर्ण करण्यास मदत केली. शिंदे हे पूर्वीपासून कायम गावी आल्यावर शेतीची कामेही आवर्जून करताना दिसतात. अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये असतानाही त्यांची शेती आणि गावाकडील नाळ तुटलेली नाही. उन्हाळ्यात गावी आल्यावर त्यांनी स्ट्रॉबेरीची (Strawberries) लागवड केली होती. त्याला लागूनच शेततळे तयार करून त्यात मासेही सोडले होते.

हेही वाचा: एफआरपी थकविणाऱ्या साताऱ्यातील आठ कारखान्‍यांवर कारवाईचे संकेत

Eknath Shinde

Eknath Shinde

कऱ्हाड : सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी त्यांच्या माळवाडी (ता. कऱ्हाड) येथील शेतात सुरु असणाऱ्या आडसाली ऊस लागणीची थेट शेतात जावून पाहणी केली. मसूर जवळील माळवाडी येथे पालकमंत्री पाटील यांची शेती आहे. दौरे, बैठका, मिटींग व अन्य जनसेवेच्या कामातून वेळ काढून ते शेतात जातात. त्यांना शेतीची आवड आहे. त्यामुळे ते वेळ काढून शेतात जातात. सध्या त्यांच्या शेतात ऊस बियाणाची लागण सुरु आहे. त्याची मंत्री पाटील यांनी थेट शेतात जावून पाहणी केली. त्यांच्या शेतात को-86032 या जातीच्या आडसाली उसाची लागण चालू आहे. यावेळी त्यांनी शेतात जावून ऊस लागण सुरू असताना पाहणी केली. यावेळी त्यांनी कामास असलेल्या मजुरांशीही संवाद साधून त्यांना लागणीसंदर्भात काही सूचनाही केल्या. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले. यावेळी दिगंबर डांगे उपस्थित होते.

Minister Eknath Shinde Drove A Tractor In The Farm Satara Agriculture News

loading image