भर पावसात शंभूराज देसाईंनी धरणग्रस्तांशी साधला संवाद

भर पावसात शंभूराज देसाईंनी धरणग्रस्तांशी साधला संवाद
Summary

'तुमच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच मंत्रालयात बैठक लावतोय, काळजी करू नका, बिनधास्त राहा,' असा धीरही दिला.

ढेबेवाडी (सातारा): जनतेच्या अडीअडचणी, समस्या व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी २४ तास अलर्ट असलेला नेता अशी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची स्वतंत्र ओळख असून, वेगवेगळ्या प्रसंगातून वारंवार त्याची अनुभूतीही जनतेला येत असते. मराठवाडीच्या धरणग्रस्तांनीही पुन्हा एकदा त्याबाबत अनुभव घेतला. ढेबेवाडीच्या अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यामधून मंत्री देसाई यांनी आवर्जून वेळ काढून मराठवाडी धरणग्रस्तांशी भर पावसात उभ्या उभ्या संवाद साधून 'तुमच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच मंत्रालयात बैठक लावतोय, काळजी करू नका, बिनधास्त राहा,' असा धीरही दिला.

भर पावसात शंभूराज देसाईंनी धरणग्रस्तांशी साधला संवाद
शेतकऱ्यांच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही : शंभूराज देसाई

मराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्री देसाई यांच्याकडूनही पाठपुरावा करण्यात येत आहे. पंचवीस वर्षांनंतर आता धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आलेले असतानाही पुनर्वसनाचे काही प्रश्न अजूनही शिल्लक असल्याने धरणग्रस्तांचा धीर खचत चालला आहे. मंत्री देसाई जिंती भागातील दरडीग्रस्त गावांच्या पाहणीबरोबरच तेथील स्थलांतरित कुटुंबांशी संवाद साधण्यासाठी आलेले असताना त्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर पावसात थांबलेल्या धरणग्रस्तांना बघून त्यांनी गाडी थांबवली व उभ्या- उभ्याच त्यांच्याशी संवाद साधत समस्या ऐकून घेतल्या. उमरकांचन येथील खालचे आवाडातील धरणग्रस्तांनी सांगली जिल्ह्यात वाटप केलेल्या जमिनीला प्रत्यक्ष पाण्याचा लाभ मिळत नाही.

भर पावसात शंभूराज देसाईंनी धरणग्रस्तांशी साधला संवाद
महिला, मुलींवर होणारे अत्याचार रोखणार; गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

कायद्याप्रमाणे चारपट जमीन, प्रत्यक्ष जमिनीला पाणी मिळेपर्यंत निर्वाहभत्ता किंवा जमिनीऐवजी रोख रक्कम मिळण्याबाबतची मागणी प्रलंबित असल्याने अजून मूळ गाव सोडले नसल्याचे सांगून घरे पाण्यात बुडाल्याने निवारा शेडमध्ये राहात असल्याचे सांगितले. उमरकांचन येथीलच चार धरणग्रस्तांचा जमीन वाटपाचा प्रश्न, सांगली जिल्ह्यातील जमीन वाटपाचे भिजत पडलेले घोंगडे आदी प्रश्नांबाबत या वेळी चर्चा झाली. त्यावर प्रलंबित प्रश्नी मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेऊन शिल्लक प्रश्नाची तड लावण्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली. या वेळी सरपंच आत्माराम सपकाळ, मनोज मोहिते, जगन्नाथ विभूते, शंकर मोहिते, छबुताई मोहिते, गणपतराव मोहिते, दत्तात्रय मोहिते आदी धरणग्रस्त उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com