कऱ्हाड - कॉंग्रेसचे जे दहा-बारा आमदार निवडुन आले त्यात घोटाळा झाला नाही आणि महायुतीचे निवडुन आले त्यात घोटाळा झाला असे म्हणने चुकीचे आहे. निवडणुक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी तसा आरोप केला असेल तर त्यासंदर्भात महायुतीचा आमदार म्हणुन समोरासमोर येवुन चर्चा करायला माझी तयारी आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडुन चर्चेसाठी समोरासमोर यावे असे थेट आव्हान पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना शनिवारी नाव न घेता दिले.