कोरोना तपासणी नाकारल्यास कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal

कोयनानगर (सातारा) : बाधितांच्या (Coronavirus) संपर्कातील लोकांच्या तपासण्या गतिमान करण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्तरीय समितींची (Village level committee) मदत घ्यावी. तपासण्या करण्यास कोणी नकार देत असेल त्यांच्यावर पोलिसांनी (Police) कारवाई करावी, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना आज दिल्या. (Minister Shambhuraj Desai Ordered If Reject Corona Test Will Action Against Satara Marathi News)

Summary

पाटण तालुक्याचा पॉझिटिव्‍हिटी रेट जास्त आहे. त्यामानाने टेस्‍टिंग रेट फार कमी असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता पोतदार, पाटणचे पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, कोयनानगरचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉ. दीपक कुऱ्हाडे, तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वांगीकर, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल शिकलगार, कोयनानगर कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे आदी उपस्थित होते.

Shambhuraj Desai
निकृष्‍ट रस्त्यावर कोट्यवधींची उधळपट्टी; गृहराज्यमंत्री घालणार लक्ष?

मंत्री देसाई म्हणाले,‘‘ पाटण तालुक्याचा पॉझिटिव्‍हिटी रेट (Positivity Rate) जास्त आहे. त्यामानाने टेस्‍टिंग रेट फार कमी आहे. आज तालुक्यात एकूण ५५७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ४१६ कोरोनाबाधित रुग्णांना (Corona patient) संस्थात्मक विलगीकरण केले आहे. दहा गावे हॉटस्पॅाट आहेत. त्यासाठी तपासण्या वाढवल्या पाहिजेत. त्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तालुका प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्तरीय समिती सक्रिय करावी. तपासण्या करण्यास कोणी नकार देत असेल, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी.’’ या वेळी अधिकाऱ्यांनी आढावा दिला.

Minister Shambhuraj Desai Ordered If Reject Corona Test Will Action Against Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com