esakal | आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

जिल्ह्यात महाबळेश्वरबरोबर पाटण मतदारसंघाला पावसाळ्यात प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो.

आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : जिल्ह्यात महाबळेश्वरबरोबर (Mahabaleshwar) पाटण मतदारसंघाला पावसाळ्यात प्रतिवर्षी आपत्तीचा सामना करावा लागतो. कोरोनाचे (Coronavirus) संकट असले, तरी आपत्तीच्या काळात प्रशासनाने हलगर्जीपणा न करता सतर्क राहावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी दिल्या. गृह राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाची बैठक झाली. (Minister Shambhuraj Desai Ordered To Officers Don't Careless In Coronavirus Disease Satara Marathi News)

जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार योगेश टोंपे आदींसह अधिकारी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘२०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुराचे संकट आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंत्रालयात आपत्तीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोयना नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरते, तेथील पूररेषा निश्चित करावी, पुराचा धोका असणाऱ्या कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था आताच करावी, पुरामध्ये ज्या गावांमध्ये जाता येत नाही अशा लोकांना अगाऊ तीन महिन्यांचे धान्य द्यावे.’’

हेही वाचा: ग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करु नका; रामराजेंचे आदेश

पाटणमध्ये पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच कार्यवाही करावी, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, ‘‘पूरस्थितीत पाटण शहरात नवीन एसटी स्टँड परिसरात ओढ्याचे पाणी तुंबते. त्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन कऱ्हाड- चिपळूण मार्ग बंद होतो. यासंदर्भात काहीच होत नाही. पाणी तुंबले, की मग प्रशासनाची धावपळ सुरू होते. ही परिस्थिती यापुढे होऊ नये.’’

Minister Shambhuraj Desai Ordered To Officers Don't Careless In Coronavirus Disease Satara Marathi News

loading image