पाटण तालुका ग्रामपंचायती निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आघाडी घेतली तर काही महत्वाच्या ग्रामपंचायतीत सत्तांतरामुळे युवा नेते विक्रमसिंह पाटणकर गटाची अनेक ठिकाणी पिछेहाट झाली आहे.
पाटण (सातारा) : सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यातील काही संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पाटण तालुका ग्रामपंचायती निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आघाडी घेतली तर काही महत्वाच्या ग्रामपंचायतीत सत्तांतरामुळे युवा नेते विक्रमसिंह पाटणकर गटाची अनेक ठिकाणी पिछेहाट झाली आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती मुळगाव, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, पेठ शिवापूर, चोपडी, त्रिपुडी, शिंदेवाडी, सोनवडे, वाटोळे, हुंबरळी, चोपदारवाडी, मणदुरे, आंबळे, वाडीकोतावडे, धावडे, दिवशी खुर्द, कातवडी, मुंद्रुळहवेली, ठोमसे, आंबळे या आहेत. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाची सत्ता आलेल्या ग्रामपंचायती काळोली, मेंढेघर, तामकडे, नेचल, सुळेवाडी, मेंढोशी, चिटेघर या आहेत.