Minister Sunil Kedar
Minister Sunil Kedaresakal

दूध उत्पादकांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढणार : मंत्री केदार

'गोविंद'ने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा कौतुकास्पद

फलटण शहर (सातारा) : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टने (Govind Milk and Milk Products) दूध उत्पादन क्षेत्रात राबवलेले उपक्रम व त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा कौतुकास्पद असून, दूध उत्पादकांना येणाऱ्या समस्यांवर राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी दिले.

Summary

महाराष्ट्रातील शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि दूध संकलन करणारे प्रकल्प टिकवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

येथील गोविंद मिल्क या दूध प्रकल्पास मंत्री केदार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar), आमदार दीपक चव्हाण, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. रामराजे यांनी मंत्री श्री. केदार यांचे स्वागत व सत्कार केला. संजीवराजे यांनी महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यां‍ना येणाऱ्या अडचणी, दुधाचे अनियमित दर, पशुखाद्य, डिझेल, कामगार खर्च आदींच्या भरमसाट वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आल्याचे निदर्शनास आणून दिले. परराज्यातील दूध कंपन्यांमुळे महाराष्ट्रातील दूध संकलन व कच्‍च्या दुधावर प्रक्रिया करणाऱ्या या प्रकल्पांना कशा अडचणी येतात, याकडेही त्यांनी पशुसंवर्धनमंत्री केदार यांचे लक्ष वेधले.

Minister Sunil Kedar
शिंदे दाम्पत्याने पालिकेची अब्रू आणली चव्हाट्यावर

महाराष्ट्रातील शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि दूध संकलन करणारे प्रकल्प टिकवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहनही संजीवराजे यांनी यावेळी केदार यांना केले. तेव्हा दूध उत्पादकांच्या समस्यांवर लवकरच सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असे मंत्री केदार यांनी सांगितले. यावेळी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक चंद्रशेखर जगताप, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, सातारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी आवटे, सातारा जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त परकाळे, उपायुक्त परिहार, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com