esakal | साम-दाम, दंड, भेद नितीसह ताकदीनं कृष्णाच्या निवडणुकीत सामील : विश्वजीत कदम
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Vishwajit Kadam

कृष्णा कारखान्यात साम, दाम, दंड व भेद नितीचा अवलंब करून ताकदीनिशी यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या पाठीशी राहणार आहे, अशी घोषणा मंत्री विश्वजीत कदम यांनी केली.

साम-दाम, दंड, भेद नितीसह ताकदीनं कृष्णाच्या निवडणुकीत सामील : विश्वजीत कदम

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कृष्णा कारखान्यात साम, दाम, दंड व भेद नितीचा अवलंब करून ताकदीनिशी यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या (Yashwantrao Mohite Rayat Panel) पाठीशी राहणार आहे, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम (Minister Vishwajit Kadam) यांनी केली. सभासदांनो, तुम्ही ठाम पाठिशी रहा. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास विश्वजित कदम कुठेही कमी पडणार नाही. माझ्या रणनीतीने निवडणूक (Election) लढत आहे, असेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. (Minister Vishwajeet Kadam Testified That He Will Fight The Krishna Factory Election Vigorously)

इस्लामपूर येथे वाळवा तालुका काँग्रेसतर्फे (Walwa Taluka Congress) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीद्वारे मंत्री कदम यांनी आज रयत पॅनेलच्या प्रचारात सक्रिय होत रणशिंग फुंकले. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते जितेश कदम व वाळवा तालुक्यातील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा: एफआरपी थकविणाऱ्या साताऱ्यातील आठ कारखान्‍यांवर कारवाईचे संकेत

मंत्री कदम म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी मोठे श्रम घेवून कृष्णा कारखान्याची उभारणी केली. कारखान्यामुळे विभागाचे नंदनवन झाले. भाऊंचे आशीर्वाद घेऊन अनेकजण मोठे झाले. त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम (Patangrao Kadam) साहेबांनी जीवंत ठेवले. डॉ. इंद्रजित मोहिते कुटुंबातील एक सदस्य आहेत. कदम कुटुंब सर्व ताकदीनिशी बाबांच्या पाठीशी आहे. उमेदवारांनी मनात कोणताही किंतू न ठेवता ही निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांनी गतीने कामाला लागावे. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रा. अनिल पाटील यांचेही भाषण झाले.

Minister Vishwajeet Kadam Testified That He Will Fight The Krishna Factory Election Vigorously

loading image