'कामावरून काढण्याची धमकी देणाऱ्यांना भारती विद्यापीठाची आठवण करुन द्या'

Vishwajit Kadam
Vishwajit Kadamesakal

विंग (सातारा) : कृष्णाच्या (Krishna Sugar Factory Election) सभासदांना ऊस दरासाठी परिवर्तन हवे आहे. आजपर्यंत कारखान्याच्या सत्तेतून स्वतःचा स्वार्थ साधला. सभासदांना केवळ दिवास्वप्ने दाखवली. त्यामुळे त्यांना निवडणुकीव्दारे घरी बसवा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Minister Vishwajit Kadam) यांनी केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्यांची संस्था ४० एकरांत आहे. तर, भारती विद्यापीठ (Bharati University) ४०० एकरांत आहे, याची त्यांना जाणीव असावी, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला. (Minister Vishwajit Kadam Criticizes The Opposition At A Meeting Of The Rayat Panel In Wing Village)

Summary

काहींनी सत्तेचा वापर केवळ खिसे भरण्यासाठीच केला. त्यामुळे कारखाना पोकळ झाल्याचा आरोप मंत्री विश्वजित कदम यांनी केला.

यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या (Yashwantrao Mohite Rayat Panel) प्रचारास येथे प्रारंभ झाला. त्यावेळी मंत्री कदम बोलत होते. पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, अविनाश नलवडे, विद्याताई थोरवडे, नानासाहेब पाटील, शंकरराव खबाले, निवास थोरात, धनाजी बिरमुळे, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, सरपंच शुभांगी खबाले, आदित्य मोहिते, रामराव नांगरे-पाटील, जयसिंगराव कदम, हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.

Vishwajit Kadam
'कृष्णा'त 32 वर्षांपासून सत्ता संघर्ष; मोहिते-भोसले मनोमिलनाचा 2010 मध्ये पराभव

मंत्री कदम म्हणाले, ‘‘काहींनी सत्तेचा वापर केवळ खिसे भरण्यासाठीच केला. त्यामुळे कारखाना पोकळ झाला आहे. भाऊंचे विचार त्यांनी सोडले. सभासदांनी पुन्हा एकदा इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा. निश्चित भविष्य उज्वल होईल. ही निवडणूक परिवर्तनाची लढाई ताकदीने व हिमतीने लढायची आहे.’’ यावेळी डॉ. इंद्रजित मोहिते, मनोहर शिंदे, अधिकाराव गरुड, इस्लामपूरचे माजी नगरसेवक संपतराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांची भाषणे झाली. अशोकराव यादव यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. शंकरराव खबाले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.

Minister Vishwajit Kadam Criticizes The Opposition At A Meeting Of The Rayat Panel In Wing Village

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com