
-जालिंदर सत्रे
पाटण : सर्व नियम धाब्यावर बसवून लाल माती, मुरूम व वाळू उपसा करून गब्बर झालेले व शासकीय यंत्रणेला राजकीय नेत्यांचे नाव सांगून वेळप्रसंगी दमदाटी करणारांची मजल आता शेतकऱ्यांच्या पिकात जेसीबी घालण्यापर्यंत गेल्याचे तालुक्यातील चित्र आहे. पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील शासकीय यंत्रणेने अशा प्रवृत्तीवर वेळीच उपचार करण्याची गरज आहे. कोयनाकाठावर माती, मुरूम व वाळू तस्करीतून मोठी घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होण्याची वेळ आली आहे.