खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर झालेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे चाललेल्या तीन वाहनांना उडविले. यामध्ये दोन पिकअप, एक मोटार व मालट्रकचे मोठे नुकसान झाले. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे.