नात्याला काळिमा फासणारी घटना! देवदर्शन करुन घरी परतताना बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार

Dahiwadi Police Station : नराधम बाप आपल्या दोन मुली व एका मुलाला घेऊन सोमवारी (ता. १९) शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) येथे दर्शनाला आला होता.
Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Updated on: 
Summary

पीडिता मुलगी मोठ्याने ओरडल्याने बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी संबंधित बापाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

दहिवडी : नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दहिवडी पोलिस ठाण्‍यात (Dahiwadi Police Station) दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संबंधित कुटुंब माळशिरस तालुक्यातील आहे.

Loading content, please wait...