

Karad Civic Elections: Balasaheb Patil Turns the Tables
Sakal
कऱ्हाड: कऱ्हाड पालिकेचा निकाल जाहीर झाला. त्यात लोकशाही-यशवंत आघाडीने नगराध्यक्षपद व २० जागांवर विजय मिळवला. वास्तविक, पालिका राजकारणात लोकशाही आघाडीला अनुकूल स्थिती असताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पालिका निवडणुकीत स्थापन झालेल्या आघाडीचे नेतृत्व केले. लोकशाही-यशवंत आघाडीच्या नगराध्यपद व ३१ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक प्रभागात कोपरा सभा, व्यक्तिगतरीत्या संपर्क साधला. त्याचे फलित निकालामध्ये दिसले. त्यामुळे माजी मंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा पालिकेत दमदार कमबॅक तर केलेच, त्याशिवाय भक्कम झालेल्या शहरातील भाजपसह आमदार डॉ. अतुल भोसले यांनाही धक्का दिला. पालिकेतील सत्तांतराचे गेमचेंजर म्हणून सिद्ध करताच राजकीय कंट्रोल पुन्हा एकदा आपल्याकडेच असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींचे दूरगामी परिणाम शक्य आहेत.