
मलकापूर : येथे कोल्हापूर नाक्याजवळ सुरू असलेल्या महामार्ग उड्डाणपुलाचा सेगमेंट बसविताना अचानक निसटल्याने दोन कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन उड्डाणपूल उभारणीच्या कामाची पाहणी केली. उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगण्याच्या सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी, ठेकेदार कंपनीला दिल्या.