कोरोनाला रोखण्यासाठी 40 हजार लशींचे डोस उपलब्ध करणार : आमदार शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Mahesh Shinde

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लोकसहभागातून 40 हजार लशींचे डोस उपलब्ध करणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी 40 हजार लशींचे डोस उपलब्ध करणार : आमदार शिंदे

विसापूर (सातारा) : कोरोना संसर्गाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी लोकसहभागातून 40 हजार लशींचे डोस उपलब्ध करणार आहे. त्यासाठी आजपासून "मदत लसीकरण अभियान' (Help Vaccination Campaign) सुरू करत आहोत. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या अभियानाला आर्थिक हातभार लावला, तर लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाला हद्दपार करणे सहज शक्‍य आहे, असा विश्वास आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी व्यक्त केला. (MLA Mahesh Shinde Assurance To Give A Dose Of 40 Thousand Vaccines To Koregaon Taluka)

पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात (Pusegaon Primary Health Center) आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख, सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर, डॉ. माधुरी पवार, डॉ. पराग रणदिवे, तलाठी गणेश बोबडे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, भरत मुळे, बुधचे सरपंच अभयराजे घाडगे उपस्थित होते. आमदार शिंदे पुढे म्हणाले, "मदत लसीकरण अभियाना'च्या माध्यमातून आरोग्य आणि महसूल प्रशासनाला सोबत घेऊन मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यापर्यंत लसीकरण कार्यक्रमाची व्याप्ती असणार आहे. तिसरी लाट येण्याआधी मतदारसंघातील 18 वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीकरणाचा पहिला डोस उपलब्ध करण्याचा मानस आहे.''

दरम्यान, लसीकरणाबाबत सविस्तर माहिती न दिल्याने शिंदे यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. गाइड लाइननुसारच लसीकरण करावे, नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सद्य:स्थितीत कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल न करता डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली कोविड सेंटरमध्येच दाखल करून घ्यावे, अशा सूचना केल्या. श्री. कासार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पुसेगाव येथील शंकर जाधव यांनी "मदत लसीकरण अभियाना'साठी दहा हजारांचा धनादेश आमदारांकडे सुपूर्त केला.

MLA Mahesh Shinde Assurance To Give A Dose Of 40 Thousand Vaccines To Koregaon Taluka