'मुंबई बाजार समितीत काय चाललंय, ते लवकरच बाहेर काढणार'

कोरेगावात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारू : आमदार महेश शिंदे
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shindeesakal
Summary

मुंबई बाजार समितीमध्ये काय चाललं आहे, ते लवकरच बाहेर काढणार आहे.

कोरेगाव (सातारा) : कोरेगाव मतदारसंघातील (Koregaon Constituency) नागरिकांना केवळ आधारकार्ड दाखवून विविध प्रकारच्या मोफत वैद्यकीय सुविधा व गंभीर आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची (Multispeciality Hospital) उभारणी करणार असून, कोरेगाव शहरात स्विमिंग पूल व स्टेडियम उभारणार असल्याचे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी सांगितले.

कोरेगाव शहरातील वॉर्ड क्रमांक सातमधील शांतीनगरमध्ये ६५ लाखांच्या ट्रिमिक्स रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनील खत्री होते. या वेळी डॉ. मिलिंद शहा, प्रा.अनिल बोधे, अॅड. चंद्रशेखर बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी उपाध्यक्ष जयवंत पवार, नगरसेविका शुभांगी बर्गे, महेश बर्गे, सुनील बर्गे, माजी उपसरपंच राहुल बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, उदयसिंह बर्गे, शिवलिंग बर्गे, फत्तेसिंह बर्गे, रवींद्र बोतालजी, रितेश बर्गे, नारायण बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या दोन वर्षांत मतदारसंघामध्ये भरीव विकास निधी आणून २५-३० वर्षे टिकणारी कामे हाती घेतली. कोरेगाव शहरामध्ये भुयारी गटार योजना, सिमेंट रस्ते आणि आता पाणी योजना, अशी तब्बल ३२ कोटींची कामे सुरू केली.’’

MLA Mahesh Shinde
कांटे की टक्कर; भाजपच्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीनं शोधला उमेदवार

सुनील खत्री म्हणाले, ‘‘नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने कोरेगावला जास्त निधी मिळत आहे. ग्रामीण भागालाही निधी देण्याचा प्रयत्न आहे; परंतु ग्रामविकास विभाग आपल्याकडे नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी समजून घेऊन कड सोसावी.’’ विधानसभेच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळून आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराला तब्बल ३२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यातील सर्वाधिक कामे वॉर्ड क्रमांक सात, आठ व नऊमध्ये सुरू असल्याने जनतेमध्ये चैतन्य असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले. या वेळी प्रा. बोधे, डॉ. शहा, श्रीकांत बर्गे, विशाल सिध्दे यांची भाषणे झाली. माजी उपसरपंच राहुल बर्गे यांनी प्रास्ताविक व नगरसेविका शुभांगी बर्गे, सागर दोशी यांनी स्वागत केले.

MLA Mahesh Shinde
'उलट त्‍यांनी म्‍हटलं पाहिजे, कोणी नसलं तरी चालेल; पण उदयनराजे सोबत हवेत'
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shinde

‘जिहे-कटापूर’वरूनही टोलेबाजी

आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचा नामोल्लेख टाळून आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘जिहे-कटापूर योजना बंद करण्याची शिफारस तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात तुम्ही केली होती. मात्र, ही योजना आमचा स्वाभिमान आहे आणि आमचा अधिकार आम्ही छाताडावर बसून घेतला आहे. कोविडबाबत पैसे घेतल्याचे ते बोलले; परंतु विरी गेलेल्यांकडे काय लक्ष द्यायचे.’’ मुंबई बाजार समितीमध्ये काय चालले आहे, ते लवकरच बाहेर काढणार आहे, असा इशारा महेश शिंदे यांनी दिला.

MLA Mahesh Shinde
बँक निवडणुकीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com