सोसायटी निवडणुकीत शिवसेनेच्या आमदार गटाचा पराभव

MaheshShinde #ShashikantShinde
MaheshShinde #ShashikantShindeesakal
Summary

विजयी उमेदवारांचे आमदार शशिकांत शिंदे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अभिनंदन केले.

विसापूर (सातारा) : कटगुण (ता. खटाव) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), उंबरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर व उदय कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमी-महात्मा फुले सहकार पॅनेलने आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महात्मा फुले पंचक्रोशी विकास पॅनेलचा १३-० ने पराभव करीत विरोधी गटाला धोबीपछाड केले.

सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघ : पोपट राघू गायकवाड, माधव राऊ वलेकर, किरण भाऊसाहेब गायकवाड, नारायण राजाराम गायकवाड, बापूराव परबत्ती गायकवाड, धनराज प्रभाकर काटकर, विजय आनंदराव कदम, मोहन गंगाराम वाघ, महिला राखीव सुमन माणिक गायकवाड, शेवंता सोपान वलेकर, ओबीसी राखीव शिवाजी कुंडलिक गोरे, विमुक्त जाती व भटक्या जमाती नवनाथ अर्जुन वलेकर, अनुसूचित जाती व जमाती मीना आगंदा जावळे. कटगुण सोसायटीचे कटगुण, उंबरमळे, काटकरवाडी, धावडदरे, शिंदेवाडी हे कार्यक्षेत्र आहे. सोसायटीवर माजी सरपंच नितीन पाटील गटाची ४० वर्षे एकहाती सत्ता होती. ती कायम राहिली आहे. कटगुण सोसायटीची निवडणूक जिंकायचीच या इराद्याने आमदार महेश शिंदे, त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे व बहीण डॉ. अरुणा बर्गे हे उतरले होते. तर ज्येष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ वलेकर व उदय कदम हे नियोजनाने निवडणुकीला सामोरे गेले आणि मोठे यश मिळवले.

MaheshShinde #ShashikantShinde
'राजकारणात हार-जीत होत असते, आता जावळीत अधिक लक्ष घालणार'

किसन गायकवाड, शिवाजी गायकवाड, माधव गायकवाड, संभाजी गायकवाड, अमर गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, सुकुमार जगताप, अरुण पाटील, सुधीर गोरे, प्रकाश गोरे, नंदकुमार गोरे, बाळू गोरे, संतोष गुरव, ज्योतिराम काटकर, जयराम निकम, किरण निकम, मधुकर गोडसे, आनंदराव काटकर, सुभाष काटकर, मधुकर गायकवाड, चिमन काटकर, भीमा कासकर, बंडा गोसावी, रघुनाथ फाळके, महेश वाघ, मोहन पाटोळे, संभाजी वलेकर, सहदेव वलेकर यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, संतोष साळुंखे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजेंद्र माने, हणमंत बोटे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com