Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

आमदार मकरंद पाटील हे नाराज नाहीत. त्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे ते खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात दिसत नाहीत.
mla makrand patil did not involve udayanraje bhosale political propaganda says shambhuraj desai
mla makrand patil did not involve udayanraje bhosale political propaganda says shambhuraj desai Sakal
Updated on

कराड : आमदार मकरंद पाटील हे नाराज नाहीत. त्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे ते खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात दिसत नाहीत. तीन मे नंतर ते प्रचारात सक्रिय होतील. त्यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीने जिल्ह्यात काम करत आहेत अशी स्पष्टोक्ती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज आमदार मकरंद पाटील यांच्याबाबत केली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कराडला आले होते. त्यांच्या दौऱ्यात आमदार मकरंद पाटील हे कोठे दिसून आले नाहीत त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या जाहीर सभा मधून ही आमदार पाटील हे दिसलेले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार पाटील हे नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात मंत्री देसाई यांना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील प्रचारात कोठे दिसत नाहीत अशी विचारणा केली त्यावर मंत्री देसाई म्हणाले, मकरंद पाटील यांच्या घरात लग्न आहे,

त्यामुळे ते या प्रचारात नाहीत. मात्र आमदार पाटील यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीने या प्रचारात काम करत आहेत. तीन मे नंतर ते या निवडणुकीत सक्रिय होतील. आमदार पाटील यांच्याशी माझा दररोज संपर्क आहे ते नाराज नाहीत.

महाराष्ट्रात 45 प्लस खासदार महायुतीचे येतील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चार जूनला शरद पवार काय आहे ते महाराष्ट्राला कळेल असे वक्तव्य केले आहे याबाबत मंत्री देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात 45 प्लस हे टार्गेट घेऊन महायुती काम करत आहे. ते उद्दिष्ट शंभर टक्के या निवडणुकीत पूर्ण झालेले दिसेल.

ठेकेदारी हाताळण्याची मला आवश्यकता नाही

कराड नगरपालिकेच्या कारभारात मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचा हस्तक्षेप झाला असा रोप पालिकेतील जयवंत पाटील यांनी केला होता. आहे या प्रश्नावर ते म्हणाले, नगरपालिका ही राज्य सरकारच्या अधिकारात येते.

नगर विकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष ठेवणे, तिथे काही त्रुटी असतील त्या दूर करणे, त्यांना काही आवश्यक असेल ते देणे हे माझे पालकमंत्री म्हणून कर्तव्य आहे.

मी माझ्या अधिकाराच्या कार्य कक्षेत ज्या बाबी आहेत त्याच्या आधीन राहूनच काम केलेले आहे मी अवाजवी हस्तक्षेप केलेला नाही. मला ठेकेदारी हाताळण्याची आवश्यकता नाही ज्याला कोणाला हाताळायची आवश्यकता आहे त्यांनी ती हाताळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
mamachya govyala jauya
Shambhuraj Desai directs digital branding and global marketing strategy for Maharashtra tourism
police FIR
Marathi News Esakal
www.esakal.com