
कोपर्डे हवेली : सह्याद्रीच्या निवडणूक निकालानंतर विद्यमान आमदार मनोज घोरपडेंकडून आमच्या पॅनेलवर नाहक आरोप होत आहेत. त्यांच्या खोट्या आरोपांना उत्तर देणे आवश्यक आहे. आमदारांनी सह्याद्रीच्या निवडणुकीनंतर आम्हाला नऊ जागा देत होतो, असे माध्यमांसमोर खोटे सांगितले आहे. प्रत्यक्षात ते दोन ते तीन जागाच द्यायला तयार होते. निवडणुकीपूर्वी त्यांना ही बुद्धी सुचली असती, तर नक्कीच ही वेळ आली नसती. त्यातून स्वाभिमानी सभासदांच्या मनातील व सर्वसामान्य सभासद कारखान्याचा अध्यक्ष झाला असता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी पत्रकार परिषदेत केले.