अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे गेल्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या : पृथ्वीराज चव्हाण

हेमंत पवार
Thursday, 17 September 2020

देशाचा एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था 24 टक्‍क्‍यांनी आकसली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊन ती पुढे किमान 10 ते 15 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे मोठी आर्थिक मंदी येणार आहे. त्याचबरोबर चीन आणि भारताबरोबरचा संघर्ष ही दुसरी समस्या आहे, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामध्ये बहुतेक असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी लोकांना वर्क फॉर्म होम असे काम सुरू केले आहे. त्यांचे पगार 50 टक्के कपात करण्यात आले आहेत. त्यामुळे फारच बिकट स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोविड आजार आहे आणि दुसरीकडे आर्थिक समस्या असल्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, सहायक गटविकास अधिकारी उषा साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, देशाचा एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था 24 टक्‍क्‍यांनी आकसली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊन ती पुढे किमान 10 ते 15 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे मोठी आर्थिक मंदी येणार आहे. त्याचबरोबर चीन आणि भारताबरोबरचा संघर्ष ही दुसरी समस्या आहे, असेही त्यांनी सांगितले. 

...तरच आम्ही पुढाकार घेऊ; मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजेंचे माेठे वक्तव्य

शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक हे घरोघरी जाऊन सर्व्हे करणार आहेत. त्यामध्ये लोकांनी खरी माहिती द्यावी. त्यामुळे काही लक्षणे असतील तर त्यावर तातडीने इलाज करणे शक्‍य होणार आहे. कोरोना हा चेष्टेचा विषय नाही. लोकांनी या संकटकाळात अंगावर आजार काढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासाखेच आहे. त्यामुळे शासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळणे आवश्‍यक आहे. व्हेंटिलेटरसाठी मी 30 लाखांचा निधी आमदार निधीतून दिला आहे. त्याचबरोबर सीएसआर फंडातूनही मी व्हेंटिलेटर उपलब्ध करत आहे. मात्र, उत्पादनच कमी असल्याने त्यावरही मर्यादा येत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

ग्राहकाला हसवतोय अन् शेतकऱ्याला रडवतोय कांदा!

कोरोनामुळे अनेक जवळची माणसे दगावली आहेत. त्यामुळे हा चेष्टेचा विषय नाही. अंगावर आजार काढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेंतर्गत घरोघरी होणाऱ्या आरोग्य सर्व्हेत खरी माहिती आरोग्य दूतांना द्या. त्यामुळे तत्काळ निदान होऊन संभाव्य धोका टाळता येईल, असे आवाहनही माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Prithviraj Chavan Held A Press Conference In Karad Satara News