esakal | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम?; माजी मुख्यमंत्र्यांच्या डॉक्‍टरांना सक्त सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Prithviraj Chavan

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्‍टरांची आढावा बैठक घेतली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम?

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचा विचार करून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज बेडसहीत वॉर्डची व्यवस्था करून ठेवावी, अशा सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी केली. कोरोनातून बरे झालेल्यांसाठी पोस्ट कोविड विभाग व्यवस्था प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. (MLA Prithviraj Chavan Review Meeting With Doctors At Primary Health Center In Karad)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्‍टरांची आढावा बैठक घेतली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अडचणी समजून घेतल्या. तेथील लसीकरण, कोरोना रुग्णांची (Corona Patient Test) तपासणीचाही आढावा घेतला. कोरोनातून बरे झालेल्यांची नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्‍यक आहे, अशी सूचना केली.

हेही वाचा: 'असा निर्णय घेणारे माेदी हे जगातील एकमेव पंतप्रधान ठरले असतील'

आमदार चव्हाण पुढे म्हणाले, "कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रकारे आरोग्य व्यवस्थेने काळजी घेतली होती. तशीच यंत्रणा, व्यवस्था दुसऱ्या लाटेत दिसली नाही. कोरोना गेल्याचे समजून यंत्रणा शांत झाल्याने दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली. ती अवस्था तिसऱ्या लाटेत होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रानी लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज बेडची व वॉर्डची व्यवस्था करण्याची गरज आहे. ज्या व्यवस्था गरजेच्या आहेत. त्याची अहवाल व मागणी पत्र शासनाकडे तत्काळ पाठवा, असेही त्यांनी सांगितले.

साताऱ्यात कडक Lockdown! कोणावर उपासमारीची वेळ, तर कोणाला मासे पकडण्याचा छंद; पाहा खास Photos

MLA Prithviraj Chavan Review Meeting With Doctors At Primary Health Center In Karad