Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फसवून त्यांचा..; आमदार शिंदे विरोधकांवर संतापले

'आमच्या गळ्यात स्कार्फ टाकून आमचे फोटो काढले. विरोधकांनी आमची फसवणूक केलीये.'
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Summary

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षासोबत प्रामाणिक राहून कार्यरत असल्याची प्रचिती यानिमित्ताने येत आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.

पळशी : मध्वापूरवाडीसह कोरेगाव मतदारसंघातील काही गावांमधील राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांना फसवून त्यांचा विरोधी गटात प्रवेश घडवून आणल्याचे, मात्र ते आजही आणि यापुढंही राष्ट्रवादीसोबत कायम राहणार असल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगितलंय, असं आमदार शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलं.

अशा प्रकारचे खोटे पक्ष प्रवेश घडवून आणणाऱ्या विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे, अशा शब्दांत आमदार शिंदेंनी (Shashikant Shinde) विरोधकांचा समाचार घेतला. मध्वापूरवाडी (ता. कोरेगाव) येथील सरपंच अनिकेत सूर्यवंशी, उपसरपंच अमोल नामदास, बजरंगगिरी महाराज, अभिजित भोसले, शिरीष भोसले, अनिल पिसाळ, अशोक पिसाळ, चेतन सूर्यवंशी, अभिजित पिसाळ, फारुख सय्यद, आसिफ भालदार, अनिमिष पिसाळ, हणमंत कदम, किरण नामदास, जमीर भालदार आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी राजेंद्र भोसले, किशोर ना. बर्गे, नितीन लवंगारे यांच्यासमवेत आमदार शशिकांत शिंदे यांची ल्हासुर्णे येथील निवासस्थानी भेट घेतली.

Shashikant Shinde
Arvind Kejriwal : गुजरातनंतर कर्नाटकात 'आप'ची एन्ट्री; स्वबळावर लढणार 224 जागा, केजरीवालांची मोठी खेळी

या वेळी स्पष्टीकरण देताना सरपंच अनिकेत सूर्यवंशी म्हणाले, ‘‘गावातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्याकडे जायचे आहे,’’ असे कारण सांगून त्यांचे स्थानिक कार्यकर्ते आम्हाला तिकडे घेऊन गेले; परंतु तेथे जाताच आमच्या गळ्यात स्कार्फ टाकून आमचे फोटो काढले गेले. हे सर्व आम्हाला अनपेक्षित होते. त्यामुळे विरोधकांनी आमची फसवणूक केली आहे. आजही आणि यापुढेही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याची ग्वाही देत आहोत.

Shashikant Shinde
Modi Government : विश्वकर्मा योजनेतून मोदी सरकार 'अशी' मिळवतंय व्होट बँक; 2024 मध्ये होणार फायदा?

त्यावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मध्वापूरवाडी (गणेशवाडी) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विरोधकांकडून जो अनुभव आला आहे, तसाच अनुभव अंगापूर वंदन, चिंचणेर निंब, कोलवडी, गोगावलेवाडीसह अन्य काही गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आला आहे. त्याबाबतचा खुलासा या गावांतील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन केला आहे.’’ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षासोबत प्रामाणिक राहून कार्यरत असल्याची प्रचिती यानिमित्ताने येत आहे, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. याप्रसंगी राजेंद्र भोसले, किशोर ना. बर्गे यांनीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाच्या व आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

Shashikant Shinde
Abdul Makki : दहशतवादाविरोधात भारताची मोठी कारवाई; अब्दुल मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून केलं घोषित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com