Tejas Shinde Resigns : आमदार शिंदेंच्या मुलाचा NCP जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचं कार्य मी केलं.'
MLA Shashikant Shinde son Tejas Shinde Resigns
MLA Shashikant Shinde son Tejas Shinde Resignsesakal
Summary

गेली पाच वर्षे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा (Nationalist Youth Congress) जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो.

पळशी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा तेजस शिंदे (Tejas Shinde) यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडं त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान, पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली. यासंदर्भातील पत्रकात त्यांनी म्हटलंय की, गेली पाच वर्षे मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा (Nationalist Youth Congress) जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो. या पदाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य मी केलं. समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून पक्षवाढीसाठी कार्य केलं आहे.

MLA Shashikant Shinde son Tejas Shinde Resigns
Britain Police : पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; कारण जाणून तुम्हीही सावध व्हाल!

कृषी पंपाची पेंडिंग कनेक्शन, डीपीचोरी, जुने विजेचे खांब रोहित्र बदलणे, तसेच वाढत्या भारनियमनाच्या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या सातारा कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शालेय नुकसान पाहता आगारनिहाय तक्रारींची नोंद घेऊन, तसेच ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीसाठी जादा पैसे मोजावे लागत होते, त्यावर तोडगा काढण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. वाढत्या महागाईसंदर्भात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

MLA Shashikant Shinde son Tejas Shinde Resigns
Narendra Modi : युक्रेन-रशिया युध्दात PM मोदीच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात; फ्रेंच पत्रकाराचं मोठं विधान

'राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार'

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळावा, यासाठी आंदोलन केले. सातारा- कोरेगाव-पुसेगाव रस्त्याचे कोरेगाव शहरातील रखडलेले काम सुरू करण्यासाठी आंदोलन केले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष या पदावरील माझा पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने, तसेच नवीन युवकांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून मी स्वेच्छेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, तसेच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे, असे शिंदे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com