esakal | राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत :  शिवेंद्रसिंहराजे
sakal

बोलून बातमी शोधा

राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत :  शिवेंद्रसिंहराजे

मराठा समाज बैठकीत ज्यांच्या कोणावर जबाबदारी देईल किंवा सर्वांच्यावतीने जे काही ठरेल त्यापध्दतीने आम्ही वाटचाल करू. राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत आहे. आम्ही कोणाच्या सवलती काढून घेऊन द्या, असे आमचे कोणाचेही म्हणणे नाही. मुळात आरक्षण स्थगित झाल्यानंतर समाजातून तीव्र प्रक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र करून सरकारवर दबाव आणणे, तसेच संघटित लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला  पुण्यात बैठक होत असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत :  शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटित लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली व ठोस दिशा मिळेल. राजघराण्याने या आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करावे, असे बोलले जात असले तरी राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे. पुण्याच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने आम्ही काम करू, असा विश्वास साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज (ता. २६) सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरूचि या निवासस्थानी भेट घेतली, तसेच मराठा समाजाची विचारमंथन बैठक पुणे येथे तीन ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीचे निमंत्रणही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले. तसेच याविषयावर चर्चाही केली.

सलग तिस-या दिवशी खासदार श्रीनिवास पाटलांनी संसदेत साता-याचे लक्ष वेधले

त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असून यामध्ये कोणत्याही राजकारणाचा हा भाग नाही. मी स्वतः मराठा समाजाचा एक घटक असून या समाजाने आम्हाला मोठे केलेले आहे. त्या या नियोजन बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने साताऱ्यातील आम्ही सर्वजण वाटचाल करू. राजघराण्याने मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व करावे असे बोलले जातेय, याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेवटी नेतृत्व हे समाजाचे आहे. येथे वैयक्तिक कोणाचाही विषय येत नाही. 

नंदुरबारचे विनय गौडा साताऱ्याचे नवे सीईओ

मराठा समाज बैठकीत ज्यांच्या कोणावर जबाबदारी देईल किंवा सर्वांच्यावतीने जे काही ठरेल त्यापध्दतीने आम्ही वाटचाल करू. राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत आहे. आम्ही कोणाच्या सवलती काढून घेऊन द्या, असे आमचे कोणाचेही म्हणणे नाही. मुळात आरक्षण स्थगित झाल्यानंतर समाजातून तीव्र प्रक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र करून सरकारवर दबाव आणणे, तसेच संघटित लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला  पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी विनायक मेटे आज आमच्याकडे आले होते. त्यांनी जिल्ह्यातील सर्वांना निमंत्रित केले आहे. मुळात मराठे एकत्र येत नाहीत हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असून वस्तुस्थिती आहे. 

आळंदी-पंढरपूर महामार्ग निर्मितीत भ्रष्टाचार : खासदार रणजितसिंह निंबाळकर

मराठा समाजातील गरजू लोकांसाठी आपली ताकद एकवटली पाहिजे. त्यामुळे एकत्र येऊन निर्णय केले पाहिजेत. विनाकारण फाटे फोडून चालणार नाही, सर्वांना एकत्र आणण्याठी विनायक मेटे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. यातून आरक्षणाचा लढ्याला चांगला सुर मिळले, तसेच आंदोलनालाही चांगली व ठोस दिशा मिळेल. त्यामुळे मी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

https://www.facebook.com/babarajefanclub/posts/2638863366366690

loading image
go to top