esakal | केळघर आरोग्य केंद्राचा प्रश्‍न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंच्या 'सीईओं'ना सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shivendrasinharaje Bhosale

केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम रखडले असून, अपुऱ्या इमारतीमुळे सामान्यांना पुरेशी सेवा देणे आरोग्य विभागास जिकिरीचे झाले आहे.

केळघर आरोग्य केंद्राचा प्रश्‍न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंच्या 'सीईओं'ना सूचना

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा) : केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Kelghar Health Center) इमारतीचा बांधकामाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी आवश्‍यक परवानगी संबंधित विभागाकडून घेऊन गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना केली. (MLA Shivendrasinharaje Bhosale Demand To The Government To Solve The Problem Of Kelghar Health Center)

केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचे बांधकाम रखडले असून, अपुऱ्या इमारतीमुळे सामान्यांना पुरेशी सेवा देणे आरोग्य विभागास जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे तातडीने इमारतीचे बांधकाम करावे, आवश्‍यक परवानगी घेऊन इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेत जाऊन आमदार भोसले यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, विकास ओंबळे उपस्थित होते. केळघर, कुसुंबी, बामणोली येथे कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी श्री. गौडा यांनी लवकरच केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. गेले अनेक वर्षे रखडलेल्या केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न आमदार भोसले यांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याचे श्री. रांजणे यांनी सांगितले.

अन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद

MLA Shivendrasinharaje Bhosale Demand To The Government To Solve The Problem Of Kelghar Health Center