चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं नागरिकांना आवाहन

MLA Shivendrasinhraje Bhosale
MLA Shivendrasinhraje Bhosale esakal

सातारा : कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनलेल्या सातारा जिल्ह्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपला सातारा या संकटातून निश्चित बाहेर पडणार आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाकडून चांगले काम सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) येणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांनी केले आहे. (MLA Shivendrasinhraje Bhosale Appeal To People Don't Trust On Fake News case Satara Marathi News)

Summary

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या सातारा जिल्ह्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. कडक लॉकडाउन (Strict Lockdown) सुरु असल्याने प्रत्येकजण अडचणीत आहे. सर्व प्रकारचे छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यासह सर्वसामान्य माणूस देखील अडचणीत सापडला आहे. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रत्येकाने थोडा धीर धरणे आवश्यक आहे. आपला सातारा कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमीसारखे सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे.

MLA Shivendrasinhraje Bhosale
ACB चा सापळा लागल्याचे लक्षात येताच त्याने दहा हजार फेकून दिले
News
News

सध्याची आकडेवारी पाहता कोरोनाच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी आता जास्त दिवस लागणार नाहीत. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) आणि जिल्हा प्रशासनाचे काम नियोजनबद्धरित्या सुरु असून कोरोनाचे संकट अंतिम टप्प्यात आहे. सोशल मीडियावर काही चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. यावर कोणीही विश्वास न ठेवता आपला जिल्हा कोरोनमुक्त करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

(MLA Shivendrasinhraje Bhosale Appeal To People Don't Trust On Fake News case Satara Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com