रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहाेलपट थांबविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची विशेष हेल्पलाईन

राजेंद्र वाघ
Friday, 25 September 2020

सातारा तालुक्‍यातील 18 गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वडूथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधांनीयुक्त कोविड सेंटर उभारण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.

कोरेगाव (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाच्या सातारा जिल्हा कार्यालयात विशेष हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, असा प्रयत्न असून, गरिबांना लागणारी औषधे व इंजेक्‍शने "ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. 

आमदार शिंदे म्हणाले, सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्‍यांतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाबरोबरच पुसेगाव, खटाव आणि वडूथ येथील नवीन शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्‍सिजनयुक्त बेड वाढविण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव केले जाणार असून, शासनाकडून आणि व्यक्तिगत माझ्या वतीने सर्वतोपरी व्यवस्था केली जाणार आहे.

नाशिकच्या बैठकीतच मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा !  

कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील कोविड सेंटरची क्षमता 30 वरून 100 खाटांपर्यंत वाढवून या ठिकाणी ऑक्‍सिजनयुक्त बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुसेगाव आणि खटावमध्येही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सातारा तालुक्‍यातील 18 गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वडूथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधांनीयुक्त कोविड सेंटर उभारण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

एकाच वेळी वन विभागातील चार कर्मचारी निलंबित 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची विशेष हेल्पलाईन
 
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळावेत, त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात विशेष हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. गरीब रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, असा प्रयत्न असून, गरिबांना लागणारी औषधे व इंजेक्‍शने "ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

कलेक्‍टरसाहेब, माणसे वाचवा... साता-यात साेमवारी मूकमाेर्चा! 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLC Shashikant Shinde Decleares Nationalist Congress Party Helpline For Covdi 19 Patients Satara News