देव तारी त्याला कोण मारी!; कदम कुटुंबीयांना आला म्हणीचा प्रत्यय

देव तारी त्याला कोण मारी!; कदम कुटुंबीयांना आला म्हणीचा प्रत्यय
Updated on

सायगाव (जि. सातारा) : "काळ आला होता; पण वेळ आली नव्हती' व "देव तारी त्याला कोण मारी' या म्हणींची प्रत्यय येथील माजी सरपंच अशोक कदम व त्यांच्या कुटुंबीयांना नुकताच धोम कालव्यावरील पूल कोसळला त्याप्रसंगी आला. नुकत्याच कोसळलेल्या धोम उजव्या कालव्यावरील पुलावरून श्री. कदम हे आपला मुलगा अमोल व देवराजसह नात देवश्री यांना घेऊन शेतात गेले होते. शेतातील काम संपवून ते माघारी फिरले. परत येताना मुलगा अमोल हे दुचाकी चालवत होते. चौघे जण पुलाजवळ आले. अमोल यांच्या काहीतरी मनात आले व गाडी थांबवली. त्याचवेळी एका क्षणात पुढे असणारा पूल तब्बल 25 फूट खोल कोसळला.

Congress च्या कोणत्या माजी मंत्री यांनी कोणाला केला फोन आणि पुढे काय घडले वाचा सविस्तर 

त्याबरोबर कालवादेखील फुटला. प्रचंड आवाज होऊन सर्व पाणी ओढ्यात घुसले व पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू झाला व पुलाबरोबर असणारा भरावदेखील क्षणात वाहून गेला. यावेळी काही सेकंदाचा अवकाश जर गाडी थांबवली नसती तर या विचाराने दोन्ही पिता- पुत्रांच्या काळजात धस्स झाले.

देवराज व देवश्री या मुलांच्या पुढे घडलेला हा प्रसंग तर त्या मुलांच्या चेहऱ्यावर आजही त्या वेळीची भीती दिसत आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून गाडी थांबवली गेली अन्यथा अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. या पुलाखालून पूल पडण्याच्या काही वेळेपूर्वी शेतात मोलमजुरी करणाऱ्या महिलादेखील गेल्या होत्या; परंतु कदम कुटुंबीयांबाबतीत घडलेला प्रसंग पाहता त्यांच्यासाठी "काळ आला होता; पण वेळ आली नव्हती,' असेच म्हणावे लागेल. 


""आमची गाडी थांबली, की काही सेकंदात समोर पूल पडताना पाहिला व काळजाचे पाणी झाले. लहान मुलांनी तर टाहो फोडला. अक्षरशः मरण डोळ्यांनी पाहिले. आजही तो प्रसंग आठवला तर अंगावर शहारे येतात. केवळ नशीब चांगले म्हणून आम्ही वाचलो.'' 

- अशोक कदम, माजी सरपंच, सायगाव 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Love Affair Ends in Bloodshed: Wife, Lover Accused in Engineer’s Murder Plot
Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14
Hard Work Pays Off as Kival Youth Clear Police Recruitment Exams
Satara’s Daughter Shines at the Border; Amit Shah Appreciates BSF Jawan Asmita Jadhav
Marathi News Esakal
www.esakal.com