Monsoon Update : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; महाबळेश्वरलाही पावसाने झोडपले

गेल्या १५ तासात कोयनानगर येथे १०१ मिलिमीटर, नवजा १०७ मिलीमीटर आणि महाबळेश्वरला उच्चांकी १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे
Monsoon Update Heavy rains in Koyna watershed area Rain lashed Mahabaleshwar too
Monsoon Update Heavy rains in Koyna watershed area Rain lashed Mahabaleshwar too
Updated on

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढले आहे. गेल्या १५ तासात कोयनानगर येथे १०१ मिलिमीटर, नवजा १०७ मिलीमीटर आणि महाबळेश्वरला उच्चांकी १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणाच्या पाणीसाठ्यात १५ तासात २.८९ टीएमसीने भर पडली असून धरणाचा एकुण पाणीसाठा ७३.१८ टीएमसी झाला आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयात प्रति सेकंद ४९६५४ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सोमवारी सायंकाळी होणाऱ्या आवक पेक्षा १८ हजार क्युसेक्सने वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ओढे नाले भरून वाहत असुन कोयना, मोरणा, तारळी, केरा, उत्तर मांड व दक्षिण मांड नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com