
-रुपेश कदम
दहिवडी : येथील संस्कृती विकास मोरे या दिव्यांग (अंध) खेळाडूची जिल्हा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी चीन येथे झालेल्या आशियायी पॅरा गेम्स स्पर्धेत महिला सांघिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत तिने कास्यपदक मिळवले होते. तिच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेऊन राज्य शासनाने अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तिला वर्ग एक पद देऊन तिचा यथोचित सन्मान केला आहे. नुकताच तिने आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.