जालना (Jalna) भागातील ऊसतोड मजूर असलेली ही महिला आपल्या चार महिन्यांच्या बाळासह उपचारासाठी रुग्णालयात आली होती.
इंदोली : उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या (Savitribai Phule Jayanti) दिवशी उपचारासाठी आलेल्या एका चार महिन्यांच्या बाळाला उलटी झाली. ती उलटी त्या बाळाच्या आजारी आईलाच साफ करायला लावल्याचा प्रकार घडला. त्याबाबत अन्य रुग्णांनी संताप व्यक्त केला.